जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी केंद्रीय जल आयोगाकडे प्रस्तावित केलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरात द्या * केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली मागणी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे मागणी

जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी केंद्रीय जल आयोगाकडे प्रस्तावित केलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरात द्या 
* केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली मागणी आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्याकडे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      शेतकऱ्यांच्या शेत जमिनी सिंचनाखाली येण्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणाऱ्या जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या 35 हजार कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरात द्यावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज केंद्रीय जल शक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.

         बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, जळगाव जामोद,  संग्रामपूर, नांदुरा,  मलकापूर,  खामगाव या सहा तालुक्यातील आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर व तेल्हारा तालुके अंतर्गत येणाऱ्या एकुन 287 गावातील 1 लक्ष 16 हजार 770 हेक्टर शेत जमीन जिगाव प्रकल्प अंतर्गत सिंचनाखाली येणार आहे . 26.01 टीएमसी जलक्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 80 टक्के काम पूर्ण झाले आहेत तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय जल आयोग मार्फत राबविण्यात येणाऱ्या e-PAMS Electronic Project Appraisal Management System (इलेक्ट्रॉनिक प्रकल्प मूल्यांकन व्यवस्थापन प्रणाली द्वारे प्रस्तावित करण्यात आले आहे. यासंदर्भातील बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. या बैठकीमध्ये हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी दिशा ठरविण्यात आली. या जिगाव प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी आवश्यक असलेल्या 35 हजार कोटी रुपयांची मागणी केंद्रीय जल आयोग अध्यक्षांकडे करण्यात आली आहे . या संदर्भातील आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता ही करण्यात आली आहे . महाराष्ट्रात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे.  या प्रकल्पामुळे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस न पडल्यामुळे दुष्काळी परिस्थिती आहे. शिवाय राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. भविष्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी या प्रकल्पाचे काम त्वरेने पूर्ण होणे गरजेचे आहे.
       जिगाव प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी लागणाऱ्या निधीला तात्काळ मंजुरात द्यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज 14 ऑक्टोबर रोजी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांच्याकडे लेखी पत्रव्दारे करण्यात आली आहे.