प्रा.लहाने सरांसाठी शिवसेनेचा धडक प्रचार , कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !* शिवसेना कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : जयश्रीताई शेळके

प्रा.लहाने सरांसाठी शिवसेनेचा धडक प्रचार , कार्यकर्त्यांमध्ये उत्साह !
* शिवसेना कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे : जयश्रीताई शेळके
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       अमरावती विभाग शिक्षक आमदारकीच्या आगामी रणसंग्रामासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला असून, नेत्यांनी संपूर्ण मतदार संघात प्रचाराचा धडाका सुरू केला आहे.शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रा.डी एस लहाने सर यांच्या विजयासाठी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिक एकवटले असून, यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आणि नवा उत्साह पाहायला मिळत आहे.
       ​अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशीम या पाचही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या संपर्क दौऱ्यांनी आणि बैठकांनी जोर धरला आहे.लहाने सर सुसंस्कृत आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना विजय मिळवून देण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी गाफील न राहता जोमाने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केले.

* जयश्रीताई शेळके सध्या विविध भागात भेटी देत असून जिल्हा दौऱ्यावर
      पुढे त्या म्हणाल्या, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, विनाअनुदानित शाळांचा लढा, जुनी पेन्शन योजना आणि एकूणच शिक्षकांच्या हक्कासाठी सातत्याने रस्त्यावर उतरून संघर्ष करणारा एकमेव पक्ष म्हणजे 'शिवसेना', हा संदेश घरोघरी आणि शाळा-शाळांमध्ये पोहोचवला जात आहे.
         कॉर्नर सभा आणि शिक्षक संवाद मेळाव्यांना शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. "शिक्षकांचा बुलंद आवाज विधीमंडळात पोहोचवण्यासाठी यावेळेस भगवाच फडकणार," असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मतदारापर्यंत थेट पोहोचण्याची रणनीती आखण्यात आली असून, यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

* ​शिक्षकांच्या हक्कासाठी "शिवसेना"

       ​शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा शिवसेनेची राहिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत केवळ विजय मिळवणे हेच ध्येय नसून, शिक्षकांना न्याय देणे हा शिवसेनेचा संकल्प आहे. कार्यकर्त्यांचा जोश आणि शिक्षकांचा पाठिंबा यामुळे सर विजयी होतील यात शंका नाही.कार्यकर्त्यांची वज्रमूठ शिवसेनेला ऐतिहासिक विजयाकडे घेऊन जाईल, असा विश्वास जयश्रीताई यांनी व्यक्त केला आहे.