"भल्या माणसाला" आमदार करन्याची शिक्षकांना संधी...*शिवसेना जिल्हा प्रमुख बुधवत यांचे भावनिक आवाहन** बुलढाणा जिल्ह्याचा विश्वास प्रा. लहाने सरांवर

"भल्या माणसाला" आमदार करन्याची शिक्षकांना संधी...
*शिवसेना जिल्हा प्रमुख बुधवत यांचे भावनिक आवाहन*
* बुलढाणा जिल्ह्याचा विश्वास प्रा. लहाने सरांवर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        गेल्या दोन दशकापासून प्रा.डी. एस. लहाने सर सर्व सामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी आहे. निवडणुका आल्या म्हणून ते कामाला लागले नाही. तर दोन दशकांची तपश्चर्या त्या पाठीमागे आहे. त्यांचे वागणे बोलणे सर्वसामान्य माणसासारखे आहे. म्हणून तर जिल्ह्याचा विश्वास त्यांच्यावर आहे. या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आमदार करण्याची संधी शिक्षकांवर आली आहे. सर आमदार म्हणजे इथला प्रत्येक शिक्षक आमदार या भावनेने काम करा.. आपला विश्वास प्राध्यापक डी. एस. लहाने सार्थ ठरवतील असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी काढले.

       कार्यकर्त्यांच्या कौटुंबिक स्नेह मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी निवडणूक होऊ घातली आहे. त्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून प्राध्यापक लहाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्राध्यापक डी. एस. लहाने हे सामाजिक क्षेत्रातील मोठे नाव असल्याने निवडणुकीमध्ये चांगलाच रंग चढला आहे. शिवसेनेच्या 80% समाजकारण व 20% राजकारण या व्याख्येत प्रा. डी एस लहाने तंतोतंत बसतात. गेल्या अनेक दशकांपासून त्यांनी समाज सेवेसाठी स्वतःला झोकून दिल आहे. शिक्षकांसाठी संवाद मिळावे, शिक्षक परिषद घेऊन, जुनी पेन्शन या मुद्द्यावर त्यांनी रान पेटविले. विधवा महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य तर प्रसिद्ध आहे. दिनांक 21 सप्टेंबर रोजी शिवसाई ज्ञानपीठ येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत होते तर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी परिसरातील बहुसंख्य शिक्षकांनी हाजेरी लावली. 
         यावेळी बोलताना बुधवत म्हणाले, शिक्षक हा समजदार मतदार आहे. प्रा. डी. एस. लहाने यांनी ज्ञानदानाचे कार्य केले आहे. शिक्षकांशी त्यांची नाळ कधीही तुटली नाही. त्यांच्या संस्थांमध्ये अनेक विद्यार्थी घडत आहे. चांगल्या प्रतीचे शिक्षण दिल्या जाणारी संस्था म्हणून लहाने यांची ओळखली आहे. सामान्य कुटुंबातील हा माणूस आमदार करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी आपण स्वतःच उमेदवार आहोत या भावनेने शिक्षकांनी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.