केळवद येथील महिला शेतकरी उज्वलाताई जाधव यांना * बुलढाणा बाजार समितीचा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान

केळवद येथील महिला शेतकरी उज्वलाताई जाधव यांना 
* बुलढाणा बाजार समितीचा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार प्रदान 
  
चिखली : (एशिया मंच न्यूज )
       तालुक्यातील केळवद येथील रहिवाशी असलेल्या महिला शेतकरी उज्वलाताई निवृत्ती जाधव यांना बुलढाणा बाजार समितीचा शेतकरी शेतीनिष्ठ पुरस्कार बाजार समितीच्या सभागृहात शनिवारी सभापती जालिंदर बुधवत यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
        गेल्या १५ वर्षांपासून उज्वलाताई जाधव शेती करतात, मधमाशी पालन, शेळीपालन , मत्स्यव्यवसाय , कुकुटपालन, कांदा चाळ, पॅक हाऊस, सिताफळ लागवड ,पेरू लागवड , बांबू लागवड आदी शेतीपूरक व्यवसाय करून त्या आधुनिक शेती करतात. त्यांच्या या कार्याची विशेष दखल घेऊन बाजार समितीने त्यांना शेतीनिष्ट पुरस्कार देऊन त्यांचा सपत्नीक गौरव केला. या कार्यक्रमाला बाजार समितीचे सभापती जालिंधर बुधवत, उपसभापती शेषराव कानडजे, संचालक तुळशीराम काळे, नंदू भाऊ शिंदे, ओमसिंग राजपूत, सुनील सोनवणे, लखन गाडेकर, माणिकराव खांडवे, कल्याणराव कानडजे, संजय दर्डा, हरी सिनकर, सुनील तायडे, प्रशांत गाढवे आदी मान्यवर उपस्थित होते. आम सभेच्या कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
       यावेळी शेतीनिष्ठ आणि विविध कृषी पुरस्कार मिळालेल्या जिल्ह्यातील  नितीन खुरद, प्रफुल्ल सुलताने, समाधान गावंडे, विठ्ठल धुळे, सुनील अंभोरे, चंद्रकला सुरुशे, मोहनसिंग राजपूत, अवचितराव पालकर या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या वतीने सन्मानचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व घटकांच्या समन्वयातून बाजार समितीला प्रगतीपथावर नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला संचालक मंडळासह, अधिकारी , कर्मचारी, व्यापारी शेतकरी बांधव, हमाल ,मापारी उपस्थित होते.