तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी

तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
        नगरपरिषद श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा येथे 24 सप्टेंबर  रोजी आयोजित तालुकास्तर शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून घवघवीत यश संपादन केले. 14 वर्षे वयोगटात कु.जान्हवी लोहिया, कु.विश्वजा काळुंखे, कु. कनिष्का खवडे,शौर्य तिडके या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
       17 वर्षे वयोगटात कु. हर्षदा तिडके, कु.आर्या पऱ्हाड ,कु. साची चौथे, अगस्त तिडके ,अश्विन चौकेकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले. सर्व विजेत्या खेळाडूंचे मुख्याध्यापक रंगनाथ कोल्हे, उपमुख्याध्यापक डी. व्हि.जाधव, सतिष मुळे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.