कला व विज्ञान कमवि रायपूर चा फुटबॉल संघ जिल्हास्तरीय ठरला विजेता* 19 वर्षे वयोगटातील स्पर्धा

कला व विज्ञान कमवि रायपूर चा फुटबॉल संघ जिल्हास्तरीय ठरला विजेता
* 19 वर्षे वयोगटातील स्पर्धा 
धाड :  (एशिया मंच न्यूज )
      क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय फूटबॉल क्रीडा स्पर्धा 23 सप्टेंबर रोजी सहकार विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज बुलडाणा येथे पार पडल्या.

      या स्पर्धेत कला व विज्ञान कमवि रायपूर ता.जि. बुलडाणा च्या १९ वर्षे वयोगटातील अरशान बेग अनिस बेग च्या नेतृत्वाखाली सय्यद फुरकान सय्यद नसीम, अरसलान खान अमजद खान, सोहिल अहेमद सलीम अहेमद, सय्यद शिबान सय्यफ किफान, अनस बेग आसिफ बेग, सय्यद उमर सय्यद जुबेर,मोहम्मद तुलेब मोहम्मद वसीम, शेख इम्रान शेख शकील, सय्यद शोमील सय्यद नदीम, अहेतशाम बेग इम्रान बेग, शेख अयान शेख रसूल, सय्यद ऐ्फाज सय्यद वसीम, मोहम्मद बर्जन अ.गफ्फार या खेळाडूंच्या  फुटबॉल संघाने तालुका स्तरावरील विजेतेपद पटकावून जिल्हा स्तरावर खेळण्याचा मन मिळविला होता. तर याच संघाने 23 सप्टेंबर रोजी सहकार विद्या मंदिर येथे झालेल्या जिल्हा स्तरावरील स्पर्धेत या संघाने सेमिफायनल पर्यंत मजल मारत सेमिफायनल सामना हा अंजुमन हायस्कुल खामगाव च्या संघाला धूळ चारत फायनल मध्ये आपले स्थान पक्के केले. तर दुसरीकडे सेंट्टल पब्लिक स्कुल लोणारने अजित इंटरनॅशनल स्कुल नांदुरा संघाला हरवत फायनल गाठले. दोन्ही दिग्गज संघ फायनल मध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले. या दोन्ही दिग्गज संघांमध्ये झालेल्या काटे कि टक्कर मध्ये कला व विज्ञान कमवि रायपूर संघ अंतिम क्षणी वीजयी ठरला.

        जिल्हास्तरावर विजय संपादन केला असून विभागीय स्तरावर फुटबॉल स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. प्रशिक्षक म्हणून जफर हुसेन यांनी मार्गदर्शन केले. या सर्व विजयी खेळाडूंचे कौतुक कमविचे प्राचार्य मोहम्मद शफी, शिक्षक मो. नावेद यांनी मैदानावर जाऊन केले. तर कमवि चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. फुटबॉल संघाच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.