शेतकऱ्यांच्या बँक खात्या बाबत केवायसीच्या तांत्रिक अडचणी दूर करा* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख विजय इतवारे यांची मागणी

शेतकऱ्यांच्या बँक खात्या बाबत केवायसीच्या तांत्रिक अडचणी दूर करा
* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तालुकाप्रमुख विजय इतवारे यांची मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        उद्धव ठाकरे साहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये त्यांनी दिलेल्या शब्द पाळत कागदपत्राच्या कुठल्याही अडचणींशिवाय थेट कर्जमुक्तीचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता. विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये कर्जमाफी देताना आधीच दुजाभाव करत आहे. त्यातही बँका तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करत शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणत आहेत.                         शेतकऱ्यांच्या बँक खात्या बाबत केवायसी व तांत्रिक अडचणी दूर कराव्यात,  अशी आग्रही मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे यांनी केली आहे.

          तालुक्यातील पाडळी येथील सेंट्रल बँक व्यवस्थापक यांची भेट घेऊन विजय इतवारे यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्या संदर्भात च्या तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी रेटली.  तसेच नुकतिच अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहिर केली आहे. पाडळी शाखेअंतर्गत कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांची यादी ची मागणी करत कुठले शेतकरी वंचित राहिली याबाबत देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. अनेक शेतकऱ्यांना KYC, फार्मर आय डी लिंक नसणे व इतर तांत्रिक अडचणी येत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अडचणी दुर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात. जेणेकरुन कोणताही शेतकरी कर्जमाफी पासुन वंचीत राहणार नाही, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 
       यावेळी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) बुलढाणा तालुकाप्रमुख विजय इतवारे, किसान सेना उपतालुकाप्रमुख रवींद्र पवार, शाखाप्रमुख शालिग्राम सोनोने, अरुण डुकरे, लक्ष्मणराव वसु, रामदास मुळे, विलास पवार , जिलानी बेग इसा बेग, दीपक मुळे, शांतिनाथ अपार, शरद गायकवाड यांच्या शेतकरी बांधव उपस्थित होते.