यशदा'च्या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी (गट अ) डॉ. अक्षय नवगिरे यांना 6 पुरस्कार !

'यशदा'च्या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी (गट अ) डॉ. अक्षय नवगिरे यांना 6 पुरस्कार !
नाशिक : (एशिया मंच न्यूज )
         पुणे येथील यशदा या संस्थेच्या 2 ते 31 जुलै दरम्यान पार पडलेल्या वैद्यकीय अधिकारी (गट अ) च्या विशेष प्रशिक्षणात डॉ. अक्षय नवगिरे यांनी खेळ व इतर उपक्रमात 6 पुरस्कार प्राप्त केले. प्रशिक्षणातंर्गत त्यांनी प्राप्त केलेल्या विशेष पुरस्काराबददल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. यशदा ही पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्था असून अधिकाऱ्यांच्या पायाभूत प्रशिक्षणासाठी यशदाची ओळख आहे. सध्या ते नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभाग आरोग्य अधिकारी अ गट पदावर नाशिक जिल्ह्यातील राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत.
         या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून एकूण 65 वैद्यकीय अधिकारी (गट अ) दाखल झाले होते. प्रशिक्षणा दरम्यान विविध प्रशासकीय बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले तसेच शासकीय कामाबद्दलही तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणातंर्गत सर्व अधिकाऱ्यांची महाराष्ट्र विधान भवनची अभ्यास भेट विशेष आकर्षण ठरली. पाचगणी येथील भिलार या पुस्तकाच्या गावालाही अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय भेट दिली.
       पुण्याजवळील मुळशी येथील वळणे हिल्स येथे ट्रेकिंगसाठी सहल काढण्यात आली होती. प्रशिक्षणा दरम्यान विविध खेळांमध्ये सहभाग नोंदवत वैद्यकीय अधिकारी (गट अ) अक्षय नवगिरे यांनी खेळांमधील कुशलता प्रदर्शीत करीत 6 पुरस्कार प्राप्त केले. यावेळी यशदाचे महासंचालक- डॉ.सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्यासह प्रशिक्षण संचालक स्वाती कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.