* समाज बांधवांची आंदोलनासाठी वज्रमूठ
चिखली : (एशिया मंच न्यूज )
आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात चिखली तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली असून, या अन्याया विरोधात लढा उभारण्या साठी आज ‘हॉटेल मनीषा’ येथे जेष्ठ सामाजिक नेते भाई प्रदीप अंभोरे मार्गदर्शनात तथा बार असोसिएशन चे अध्यक्ष सतीश गवई यांचे अध्यक्षतेत उद्योजक मनीष मोरे युवा नेते विजयकांत गवई, प्रा.गवई, राजेंद्र सुरडकर शिनगारे, विधिज्ञ जाधव सिद्धांत वानखडे, मधुकर मिसाळ, प्रशांत डोंगरदिवे, प्रा. खरात, प्रा.गवई, राजेंद्र सुरडकर, संजय धुरंधर, बाळासाहेब भिसे, संघमित्रा कस्तुरे, संकेत जाधव, मुकेश भंडारे, संदीप अंभोरे, राजू झिने, दीपक कस्तुरे, प्रदीप वाकोडे, सतीश बडगे, संजय निकाळजे, किरण शेजोळ सुमित जाधव, प्रकाश बनकर डॉ. गजानन जाधव, भगवान गवई, गौतम जाधव, माजी सैनिक आदी सामाजिक, राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील बौध्द, चर्मकार समाज बांधवांची एक तातडीची व महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाला ठाम विरोध दर्शवत आगामी ३१ ऑगस्ट रोजी भव्य आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
‘संविधान वाचवा, आरक्षण वाचवा!’चा नारा महापुरुषांच्या विचारांना आणि संविधानाला अभिवादन करून सुरू झालेल्या या बैठकीत सर्व समाज प्रतिनिधींनी एकमुखाने उपवर्गीकरणाच्या धोरणाचा तीव्र निषेध केला. "आरक्षण हा आमचा घटनात्मक आणि संविधानाने दिलेला हक्क आहे ; त्यात उपवर्गीकरण करून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही," असा इशारा बैठकीतील वक्त्यांनी दिला.
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व निर्णय:
आंदोलनाची तारीख व वेळ: आगामी सोमवार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२ वाजता चिखली तालुका स्तरावर 'आरक्षण उपवर्गीकरण विरोध आंदोलन' छेडले जाईल. एकजुटीचा निर्धार: "ना कुणाचा द्वेष, ना कुणाची भीक - आम्हाला फक्त आमचा हक्क हवा आहे!" या भूमिकेवर ठाम राहत सर्व घटकांनी एकत्र येऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलन समितीची स्थापना: आंदोलनाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यासाठी 'आरक्षण उपवर्गीकरण विरोध आंदोलन समिती, चिखली तालुका' या मार्गदर्शक समितीची स्थापना करण्यात आली.
तालुक्यातील जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन' आरक्षण वाचवा! संविधान वाचवा! देश वाचवा!!' या मुख्य उद्घोषासह तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
