* बुलढाण्याच्या मातीतील "शेळकें" नी उभा केला 'पॅंथर' चा इतिहास !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
1970 च्या दशकामध्ये गावा गावामध्ये पॅंथर या लढाऊ सामाजिक संघटनेने मुसंडी मारली होती. सामाजिक न्यायासाठी संघर्ष व शोषणाच्या विरोधात पँथरचा संघर्ष राहीला . या संघर्षाचा इतिहास आता रुपेरी पडद्यावर दर्शकांना बघायला मिळणार आहे. बुलढाणा च्या मातीतील "बावन्नकशी" सोने ठरलेल्या सुनील शेळके यांनी पूर्वी परिवर्तनाचा इतिहास 'सत्यशोधक ' मांडला तर आता मिशन पँथर - 1970 रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठीच्या सीमा ओलांडून देशातील अन्य पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, हे विशेष.
सुनील शेळके यांनी अभिता फिल्म कंपनी स्थापन करून चित्रपट निर्मिती सुरू केली आहे. पॅंथरचे ते निर्माते आहे. तर शैलेंद्र बागडे दिग्दर्शक असून चिन्मय मांडलेकर मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना भेटणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरचे नुकतेच अनावरण मुंबई येथे पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत मंडळींनी आवर्जून हजेरी लावली. उत्सुकता वाढविणारा हा चित्रपट देशभर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांचा सत्यशोधक चित्रपटाची बौद्धिक क्षेत्रामध्ये विशेष चर्चा झाली होती. तर आता चळवळीचा इतिहास लाभलेला पॅंथर देशातील विविध भाषेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
* सुनील शेळके... सिर्फ नाम नही, काम भी!
*सुनील शेळके मितभाषी *व्यक्तिमत्व, ते कमी बोलतात, मात्र त्यांचे काम दीर्घकाळ बोलत असते. चित्रपटाच्या रुपेरी दुनियेमध्ये त्यांनी पाऊल ठेवले असून पॅंथरच्या रूपाने दुसरा दमदार प्रयत्न केला आहे.
* शिरपूर सारख्या टीचभर गावातून आलेले हे व्यक्तिमत्व :
* उपजिल्हाधिकारी बनते काय ? आणि लाल दिव्याची गाडी सोडून वेगळ्याच क्षेत्रामध्ये पदार्पण करते. विविध भन्नाट आयडिया सतत डोक्यात घोळवणारे सुनील शेळके सिर्फ नाम नही तर काम भी हैl
*अभिता लँड कंपनी स्थापन करून त्यांनी त्यांच्या मनातील अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे सुरू केले आहे. चित्रपट असेल उद्योग व्यवसाय असेल या माध्यमातून त्यांचे प्रयत्न सुरू आहे. पॅंथरच्या रूपाने त्यांनी दुसरा दमदार प्रयत्न केला आहे.
