* अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनचा एक स्तुत्य उपक्रम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
ईद मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त, रविवार २३ ऑगस्ट रोजी इक्बाल चौक जामा मशिदीजवळ अल मदीना एज्युकेशन फाउंडेशनने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात जवळपास 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून पैगंबर मोहम्मद साहेब यांना आदरांजली वाहिली.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनकडून हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पैगंबर साहेब यांच्या १५०१ व्या जयंतीचे विशेष महत्त्व असल्याने, ईद मिलादुन्नबी देशभर आणि जगात उत्साहात साजरी केली जात आहे.
१५०१ व्या जयंती अविस्मरणीय करण्यासाठी आणि समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी, अल मदिना फाउंडेशनकडून विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्त संकलनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणाच्या पथकांनी सहकार्य केले.
यावेळी विविध सामाजिक, राजकीय आणि शासकीय मान्यवरांनी शिबिराला भेट दिली. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख, वसीम खान, रईस काज़ी, सलमान खान, ईमाद काज़ी, फरदिन शेख लाला, जलाल शेख, सोहेल, सय्यद इस्माइल, अथर शेख, नाज़िम खान, अज़ीम, नेहान खान, सय्यद अबरार, शेख फरहान आदिने अथक परिश्रम केले.
