महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कृषी क्षेत्राचे दूरदृष्टीचे नेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुलढाणा येथे भावपूर्ण अभिवादन कार्यक्रम उत्साहात व सामाजिक बांधिलकीच्या वातावरणात संपन्न झाला.

      कार्यक्रमाच्या प्रारंभी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. यावेळी वसंतराव नाईक यांच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विशेषतः कृषी, सिंचन, ग्रामीण विकास, शेतकरी हित आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांनी घेतलेल्या दूरदृष्टीपूर्ण निर्णयांचा गौरव करण्यात आला.

         या कार्यक्रमास  राजू राठोड नायक, विठ्ठलराव चव्हाण कारभारी, रमेश राठोड, रामदास जाधव, रमेश चव्हाण, बि.के. चव्हाण, शंकर राठोड, घनश्याम चव्हाण, रघुनाथ जाधव, अमोल जाधव, दयाराम जाधव, गजानन राठोड, साहेबराव चव्हाण, बदुसिंग जाधव, प्रेमकुमार राठोड (पत्रकार), एकनाथ चव्हाण, शंकर चव्हाण, चंपालाल राठोड महाराज, अंकुश जाधव, प्रकाश हिरामण राठोड, श्रीराम जाधव, बाबुराव चव्हाण, दत्ता पाटील, दीपक वारे, मुकुंद देशपांडे, रामेश्वर चव्हाण आणि विशाल चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

      यावेळी उपस्थित मान्यवरांनी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या कार्याचा आणि विचारांचा महाराष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासावर झालेला प्रभाव अधोरेखित केला. शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

       वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी क्षेत्राला दिलेले महत्त्व, ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी राबविलेल्या विविध योजना तसेच शेतकरी व सामान्य जनतेच्या प्रश्नांना दिलेले प्राधान्य यामुळे त्यांचे कार्य सदैव स्मरणात राहील, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी महानायक वसंतरावजी नाईक यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महानायक वसंतरावजी नाईक अमर रहे! अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

       महानायक वसंतरावजी नाईक यांच्या विचारांचा आणि विकासाच्या दृष्टिकोनाचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.