* वंजारी समाज बांधवांकडून बुधवत यांचा सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांची बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्याबद्दल बुलढाणा शहरातील वंजारी समाज बांधवांच्या वतीने आज गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाज बांधवांनी जालिंदर बुधवत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी अविरोध निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या सत्कार समारंभास रामराव आघाव, प्रल्हाद केदार, ब्रदीनाथ कायंदे, प्रकाश नागरे, गजानन खार्डे, अनिल वारे, अजित पालवे, अनिल इलग, पत्रकार प्रवीण थोरात, जगन जायभाये, हरिदास दराडे, घुगे सर, देवानंद ताठे, सुधाकर मुंढे मामा, किरण दराडे यांच्यासह वंजारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी बुधवत यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. समाजाच्या विविध प्रश्नांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा निश्चितच उपयोग होईल, अशी भावना उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केली.
