रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते : मिन्हाज खान* जीवनरक्षक रक्तदान शिबिरात उत्साहाचे वातावरण


रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते : मिन्हाज खान
* जीवनरक्षक रक्तदान शिबिरात उत्साहाचे वातावरण 

बुलडाणा (प्रतिनिधि)
         शहरातील गवळीपूरा येथील जमीयत अहेले हदीस संयुक्त इस्लामिक गार्डन्स सेन्टरच्या वतीने मोहम्मदी मस्जिद मध्ये रक्तदान शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करून गरीब, गरजू किंवा आजारी व्यक्तीचे प्राण वाचवणे हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. गरीब, गरजू, आजारी यांना रक्त देऊन त्यांची सेवा करणे हा प्रत्येक धर्माचा संदेश आहे. रक्तदान शिबिरात सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप तडवी, जमीयत अहेले हदीसचे ज्येष्ठ शेख रहीम बाबू, जिल्हा जमीयत अहेले हदीसचे जिल्हा प्रमुख मिनहाज खान, नदीम खान, डॉ. सिफाअत, डॉ. कमर, आय. जी. सी. चे उमेर देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जमीयत अहेले हदीस संयुक्त आएजीसी च्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.     
      या मोहिमेत संकलित झालेले रक्त जीवनधारा बुलढाना अर्बन ब्लड सेंटरला रक्त दान करण्यात आले. यावेळी बोलतांना प्रमुख पाहुणे दिलीप तडवी म्हणाले की, आजच्या परिस्थितीत असे कार्य कौतुकास्पद आहे. सामाजिक संस्थांचे कौतुक करताना ते म्हणाले की, बुलडाण्यात अशा कार्यक्रमामुळे मानवतेचा संदेश तर जाईलच शिवाय देशात चांगले वातावरण निर्माण होईल. मिनहाज खान म्हणाले की, रक्तदान केल्याने आरोग्याला कोणतीही हानी होत नाही, उलट शरीरात जमा झालेले रक्त कमी वेळात बाहेर पडते. पुढे ते म्हणाले की, अशी अनेक संशोधने आहेत ज्यामुळे सतत रक्तदान करणाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते. मानवी रक्त हा जीवनातील सर्वात महत्वाचा घटक आहे जो कृत्रिम पदार्थांद्वारे बदलला जाऊ शकत नाही. मोठ्या शस्त्रक्रिया आणि अपघातग्रस्त रूग्णांच्या आपत्कालीन सेवेत  संपूर्ण रक्ताचा वापर हा एक आवश्यक उपाय आहे. रक्त संक्रमणाद्वारे दरवर्षी लाखो लोकांचे प्राण वाचवले जात आहेत. तर उमेर देशमुख म्हणाले की, जमीयत अहेले हदीस व आयजीसी च्या माध्यमातून दर महिन्याला गरीब,  गरजू  विधवा महिलांसाठी शहरातील 90 घरापर्यंत राशन किट त्यात दररोज लागणारी वस्तूंचा समावेश आहे. मानवतेची सेवा हे अत्यंत उच्च कार्य आहे. भुकेल्यांना अन्न दिल्याने अल्लाह खूप प्रसन्न होतो. जमीयत अहले हदीस च्या वतीने मोहम्मदी दस्तरखान सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गोरगरीब, गरजूंना दोन वेळीचे जेवण शुद्ध शाकाहारी विनामूल्य उपलब्ध आहेत. तसेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पुस्तक रजिस्टर तर गरजू रुग्णांना औषध देण्यात येते. अव्वामी बैतूल माल, जमीयत अहेले हदीस, इस्लामिक मार्गदर्शक केंद्र च्या वतीने पुर्ण वर्षभर मदत कार्य सुरु आहे. दान करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एखाद्याला पाणी देणे हे लक्षात ठेवा, पाणी हे जीवन आहे. ईश्वराकडून मिळालेली देणगी पाणी देणे हे इस्लाममध्ये एक उत्तम कार्य आहे. गरजूंची तहान भागव्याची आणि अनंत बक्षिसे आणि आशीर्वाद मिळविण्याची ही संधी आहे. जमियत अहेले हदीस संयुक्त अव्वामी बैतुल माल च्या वतीने बुलडाणा बस स्टैंड, चिखली स्टाप, बाजार लाईन, टिपू सुलतान चौक येथे शुद्ध मिनरल वॉटरची पाणपोई लावण्यात आली आहे.
        कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमियत अहेले हदीस, अव्वामी बैतूल माल आणि आय जी सी चे कार्यकर्त्यांचा सहभाग घेतला होता.