ईद मिलातुनबी निमित 23 ऑगस्टला भव्य स्क्तदान शिबिराचे आयोजन

ईद मिलातुनबी निमित 23 ऑगस्टला भव्य स्क्तदान शिबिराचे आयोजन 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        ईद मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त रविवार 23 ऑगस्ट रोजी इक्बाल चौक जामा मशिदीजवळ अल मदीन फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

          दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अल मदिना एज्युकेशन फाउंडेशनकडून हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यावर्षी पैगंबर साहेब यांच्या १५०१ व्या जयंतीचे विशेष महत्त्व असल्याने, ईद मिलादुन्नबी देशभर आणि जगात उत्साहात साजरी केली जात आहे. १५०१ व्या जयंती अविस्मरणीय करण्यासाठी आणि समाजातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी, अल मदिना फाउंडेशनकडून विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  

      रविवार २३ ऑगस्ट रोजी
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक इक्बाल चौक जामा मशिदीच्या मैदानात करण्यात आले आहे . सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर सुरु राहिल. जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन अल मदीना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी  केले आहे.