बंजारा समाजाची काशी पोहरादेवीसाठी थेट बससेवा सुरू करा : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाची काशी पोहरादेवीसाठी थेट बससेवा सुरू करा : बंजारा समाजाची मागणी 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे जाण्यासाठी थेट बससेवा सुरू करावी अशी मागणी बंजारा समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.

         याकरिता बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड व राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बंजारा अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे अध्यक्ष दरबार राठोड, करवंड येथील महंत मांगीलाल महाराज, वरवंड येथील महंत चंपालाल महाराज, माजी सरपंच प्रकाश चव्हाण ,बुलढाणा तांड्याचे नाईक राजु राठोड तसेच त्यांचे सहकारी कारभारी विठ्ठल चव्हाण, बाबुराव चव्हाण, श्याम चव्हाण, रामेश्वर राठोड ,अनिल राठोड ,विठ्ठल राठोड , पिलू राठोड, सुनील करंडे, साहेबराव चव्हाण व बहुसंख्य बंजारा बांधव उपस्थित होते.