बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात तब्बल सतरा वर्षापासून काम करीत असलेले श्री. सचिन लक्ष्मण पिंगळे याना दिनांक १३ मे २०२५ रोजी महामहीम राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र शासनाकडून दिल्या जाणारा औद्योगिक क्षेत्रातील मानाचा राज्यस्तरीय विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे. व त्यापाठोपाठ परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांनी यावर्षी पासून सुरू केलेला राज्यस्तरीय. लाल परी गौरव रत्न पुरस्कार - २०२६ हा सचिन लक्ष्मण पिंगळे यांना एस.टी. महामंडळाच्य प्रादेशिक कार्यालय, अमरावती येथे देऊन सन्मानित करण्यात आले . संपूर्ण महाराष्ट्रातून ९८ कर्मचाऱ्यांची निवड या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. त्यापैकी संपूर्ण महाराष्ट्रातून लिपिक प्रवर्गातून एकमेव सचिन लक्ष्मण पिंगळे, लिपिक, विभागीय कार्यालय, रा.प. बुलढाणा यांची निवड झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लिपिक प्रवर्गातील लाल परी गौरव रत्न पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले आहे. त्याबद्दल त्यांचे विभागीय वाहतूक अधिकारी दिगंबर जाधव, विभागीय लेखा अधिकारी बहिरम आगार व्यवस्थापक राप बुलढाणा अमोल गडलिंग, आगार व्यवस्थापक राप.खामगाव, जंजाळ आगार व्यवस्थापक, रा .प.चिखली जोगदंडे , आगार व्यवस्थापक रा.प.मेहकर हर्षल साबळे, आगार व्यवस्थापक रा.प.जळगाव जामोद टाले, आगार व्यवस्थापक रा.प. मलकापूर नावकर , आगार व्यवस्थापक रा.प.शेगाव कोळपे, विभागीय कार्यालय कर्मचारी यांनी सचिन लक्ष्मण पिंगळे यांचे अभिनंदन केले.
