अतिवृष्टीग्रस्त पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने वितरित करा
* राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांची तहसील कार्यालयवर धडक !
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
तब्बल नऊ महिने होऊनही अतिवृष्टीग्रस्त हजारो शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई प्रलंबित असल्याने राज्यप्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी सोमवार 13 जुलै रोजी तहसील कार्यालयवर धडक दिली. तहसीलदारांसोबत यावेळी चर्चा करण्यात येऊन नुकसान भरपाई त्वरित वितरित करण्याची मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले. नोव्हेंबर 2025-26 मधील अतिवृष्टीमुळे मोताळा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मका तसेच इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामेही झाले आणि शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, आजही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. जवळपास 3100 शेतकऱ्यांची अद्यापही केवायसी प्रलंबित आहे. शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचा सामना केला, मात्र आता त्यांना शासकीय दिरंगाईचा सामना करावा लागतोय. ही दुर्दैवी बाब आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने मोताळा तहसीलदार यांच्याशी चर्चा करीत नोव्हेंबर 2025-26 मधील अतिवृष्टीग्रस्त पात्र शेतकऱ्यांना प्रलंबित नुकसानभरपाई तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी तालुकाप्रमुख विजयकुमार इंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, तालुकाप्रमुख युवासेना मोहित राजपूत, तालुकाप्रमुख महिला आघाडी कल्पनाताई पुरी, शहरप्रमुख रमेशभाऊ धुनके, जितेंद्र खराटे सांगळद, विभाग प्रमुख गणेशभाऊ किनगे, एकनाथभाऊ बांगर पुन्हई, शाखाध्यक्ष पोफळी प्रशांत प्रल्हाद पालवे, प्रतीकभाऊ भारसाकळे, शेख साबीर मोहम्मद शब्बीर, विष्णूभाऊ वाघ ऊबाळखेड, विठ्ठलभाऊ घोंगटे, गोपाळभाऊ घोंगटे, अनिल पाटील, संतोष घोंगटे आव्हा, योगेश पैसोडे अंत्री, निर्मल विजय इंगळे, श्रीकृष्ण रामभाऊ तायडे घुस्सर, संजय देविदास जाधव घुस्सर, नारायण विनायक व्यवहारे पोफळी, प्रशांत पाटील वारुळी, परमेश्वर गजानन मानकर रिधोरा, गोपाल दिवाने शिरवा, मयूर गुणवंत मानकर रिधोरा, चरणसिंग बोराळे वारुळी, अमोल मेढे चावर्दा, तुषार धुरंदर, अजय खराटे, विवेक खराटे, पिंपरी गवळी, भूषण रमेश पाटील, आकाश कैलास सोनोने ऊबाळखेड, पुंजाजी गायकवाड भोरटेक, सुभाष रघुनाथ पाटील, योगेश महाजन, अरुणा महाजन लिहा, अनिल सुरडकर, काशिनाथ शामराव बिचकुले धामणगाव देशमुख, शांतारामभाऊ सावळे राजुर यांच्यासह अनेक शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते.
