* मान्यवरांच्या उपस्थितीत विक्री दालनाचा शुभारंभ
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
'आपला विश्वास, आमची गुणवत्ता'..हे ब्रीद घेऊन तत्पर सेवेसाठी कटीबद्ध अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या अभिता पशु आहार विक्री दालनाचा माळशिरस (जि.सोलापूर) येथे शुभारंभ करण्यात आला. तसेच अभिता ड्रोन सर्व्हिस सुद्धा सुरू करण्यात आली आहे.
उद्घाटन सोहळा विधानपरिषदचे मा.आ.ॲड. रामहरी रूपनवर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कंपनीचे संस्थापक सीईओ सुनील शेळके, मा.उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब समिंदर, जोशाबा सोशल वेलफेअर फाउंडेशनचे संस्थापक आशुतोष समिंदर, परिसरातील कृषिसेवा केंद्र संचालक, दुध डेअरी संचालक, शेतकरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पशुपालक उपस्थित होते. अधिक माहितीसाठी माळशिरस येथील अधिकृत विक्रेते
योगेश गवई यांच्याशी (7387716068) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
