सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी यांच्या मागणीला यश* धाड येथील आझाद चौकातील बस थांबा पुन्हा सुरू

सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी यांच्या मागणीला यश
* धाड येथील आझाद चौकातील बस थांबा पुन्हा सुरू
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          सन 2001 मध्ये जाकीर कुरेशी यांच्या पाठपुराव्याने बुलडाणा रोड धाड येथील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेले मौलाना आझाद चौक येथे एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचा थांबा देण्यात आला होता परंतु गेल्या काही वर्षांपासून याठिकाणी बहुतांश एसटी बसेस न थांबता निघून जात होते. याठिकाणी बसच्या प्रतीक्षेत उभे असलेल्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसून आले. सदर बाब सामाजिक कार्यकर्ते जाकीर कुरेशी यांच्या निदर्शनात येताच त्यांनी विभागीय वाहतूक अधिकारी रा.प.बुलडाणा यांना निवेदन देऊन तत्काळ मौलाना आझाद चौक धाड येथील बस थांबा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.
        सदर मागणीची दखल घेत रा. प.विभाग बुलडाणा यांनी मौलाना चौक येथून जाणाऱ्या प्रत्येक बसेसला त्याठिकाणी थांबण्याचे आदेश दिले असून आता धाड येथील मौलाना आझाद चौक येथे एसटी बस थांबा पुन्हा मंजूर करण्यात आले आहे.