* वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला भेट
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
देशभरातून सोनम वांगचुक आणि अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला प्रचंड पाठिंबा मिळत आहे. शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या लढ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक ताकदीने सोबत आहोत, असा विश्वास आणि घोषणा पक्षाच्या राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली.
सामाजिक व पर्यावरण कार्यकर्ते, शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला जयश्रीताई शेळके यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांच्यासह भेट दिली. यावेळी आपल्या सडेतोड शैलीत त्यांनी केंद्र सरकारवर तोफ डागली. जयश्रीताई म्हणाल्या, देशातील सर्वात मोठ्या नीट पेपर घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्यायला तयार नाहीत. निगरगट्ट सरकार त्यांना पायउतार करायला तयार नाही.
