केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत 18 जुलैला सिंदखेड राजा येथे होणार जनता दरबार !* जनतेच्या तक्रारींचा होणार ऑन दि स्पॉट निपटारा

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत  18 जुलैला सिंदखेड राजा येथे होणार जनता दरबार !
* जनतेच्या तक्रारींचा होणार ऑन दि स्पॉट निपटारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींच्या समस्यांच्या, तात्काळ निपटारा करण्यासाठी आज 18 जुलै रोजी सिंदखेडराजा येथे जनता दरबाराचे आयोजन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थिती मध्ये करण्यात आले आहे.

       केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलडाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये नागरिकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने सर्व सामान्य जनतेच्या तक्रारींचा , समस्यांच्या ऑन दि स्पॉट निपटारा करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व प्रशासकिय अधिकारी त्यांच्या उपस्थितीत जिल्हातील सातही विधानसभा मतदार संघ निहाय जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. या जनता दरबार कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रमाता जिजाऊंच्या पावन भुमितुन करण्यात येणार आहे.
         सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचा पहिला जनता दरबार  18 जुलै रोजी सिंदखेड राजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारामध्ये सिंदखेडराजा मतदार संघातील जनतेच्या तक्रारी, समस्यांचा ऑन द स्पॉट निपटारा केल्या जाणार आहे.