* राजर्षी शाहू मल्टीस्टेटचा मुक्ताईनगर येथील ग्राहक मेळावा उत्साहात
मुक्ताईनगर : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू मल्टिस्टेटच्या माध्यमातून सर्वोत्तम सेवा देण्यासह समाजहिताला आपले प्राधान्य राहिले आहे. रक्तदान चळवळ, आर्थिक साक्षरता अभियान, शेतकरी हिताचे उपक्रम, कोल्ड स्टोअरेज यांसह विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे राबवण्यात येतात. सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी संस्था सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी व्यक्त केला.
संत मुक्ताबाईंच्या पावनभूमीत १५ जुलै रोजी राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी, मुक्ताईनगर शाखेचा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी दुय्यम निबंधक शुभम बावके, दिलीप पाखरे , प्रमोद सोनवणे, मोहन मेढे, मोतीलाल जोगी, अरुण वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात थोर महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमात बी. डी. गवई, देवेंद्र बोदडे, संजय निंभोरे, मुरलीधर इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या समाजाभिमुख उपक्रमांचे, ग्राहककेंद्री सेवांचे व विश्वासार्ह कार्यपद्धतीचे कौतुक केले. कार्यक्रमाला स्थानिक संचालक मंडळ, ग्राहक, सभासद, खातेदार, ग्रामस्थ तसेच सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण, विभागीय व्यवस्थापक कृष्णा सावळे, निखिल शिंबरे, शाखा व्यवस्थापक विजय महाजन, सागर शेळके, मंगेश काटे, कृष्णा दांडगे व कर्मचारी उपस्थित होते.
आयएएस मोहिनी जगताप यांच्या आई-वडिलांचा सत्कार
यूपीएससी परिक्षेत देशात ३२३ वा क्रमांक मिळवत आयएएसपदी निवड झालेल्या मुक्ताईनगरच्या मोहिनी अशोक जगताप यांच्या आई-वडिलांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक, वकील, पोलीस दलात नियुक्त युवक, वनरक्षक, परिवहन महामंडळातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
