केंद्र व राज्य सरकारचे हृदय दगडाचे - आहे : ऍड. प्रवीण सुरडकर* सोनम वांगचुक यांच्या जंतरमंतरवरील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एकदिवस बैठा सत्याग्रह..

केंद्र व राज्य सरकारचे हृदय दगडाचे - आहे :  ऍड. प्रवीण सुरडकर
* सोनम वांगचुक यांच्या जंतरमंतरवरील उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एकदिवस बैठा सत्याग्रह..
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        लडाखचे जगप्रसिद्ध अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि कल्पक शास्त्रज्ञ सोनम वांगचूक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे ऍड. प्रवीण सुरडकर यांनी १८ जुलै रोजी जयस्तंभ चौकात एकदिवसीय बैठा सत्याग्रह आंदोलन सुरु केले. दोन फलकांसमोर त्यांनी दगड ठेवले आहेत. यावरुन केंद्र व राज्य सरकार दगडाच्या हृदयाचे असल्याचा संदेश त्यांनी दिला आहे.

         नीट आणि नेट परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीकरीता सोनम वांगचुक बेमुदत उपोषणावर बसले आहेत. देशभरात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारवर काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. सरकार आपल्या मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांच्या प्रश्नाचे सरकारला काही घेणे देणे नाही. सोनम वांगचुक इतक्या दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. परंतु, त्यांच्या तब्येतीची सरकारला काळजी नाही. यावरून हे सरकार दगडाच्या हृदयाचे आहे, असा संदेश प्रवीण सुरडकर यांनी दिला आहे.