* पारदर्शक कारभाराचे अन सभासदाभिमुख सेवांचे कौतूक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
धन समृद्धी सहकारी नागरी पतसंस्था मर्या. पळसे (जि. नाशिक) चे संस्थापक अध्यक्ष शामराव गायधनी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या मुख्यालयी सदिच्छा भेट दिली. यानिमित्ताने सहकारातील अनुभवांची प्रेरणादायी देवाणघेवाण करण्यात आली.
संस्थेच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी संपुर्ण टीमचे पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत केले. संस्थेच्या कार्यपद्धतीची पाहणी करताना सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक व मार्गदर्शक चर्चा झाली.
यावेळी शरद ढमाले (व्हाईस चेअरमन), किरण ढेरिंगे (कार्यकारी संचालक), भारत ढेरिंगे (कर्ज समिती अध्यक्ष), इंद्रभान जाधव (अल्पबचत समिती अध्यक्ष) आणि किरण मोरे (संचालक) यांचा सत्कार करण्यात आला.भेटीनंतर मान्यवरांनी राजर्षी शाहूच्या कार्यपद्धतीचे, पारदर्शक व्यवस्थापनाचे आणि सभासदाभिमुख सेवांचे मनापासून कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी संस्थेचे सरव्यवस्थापक दिलीप चव्हाण यांच्यासह कर्मचारी वृंद उपस्थित होते.
