डिजिटल, बँकिंग सेवा आता एकाच छताखाली !* खारघर येथे पहिल्या अभिता ई- सुविधा केंद्राचे उद्घाटन

डिजिटल, बँकिंग सेवा आता एकाच छताखाली !
* खारघर येथे पहिल्या अभिता ई- सुविधा केंद्राचे उद्घाटन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         नेहमी काळाच्या पुढचा विचार करणारे अभिता कंपनीचे संस्थापक तथा सीईओ सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून खारघर (मुंबई) येथे राज्यातील पहिल्या अभिता ई सुविधा केंद्राचे थाटात उदघाटन आज 2 जुलै रोजी झाले.

           सेवानिवृत्त (व्हीआरएस) उपजिल्हाधिकारी सुनील शेळके यांना प्रशासनातील दांडगा अनुभव आहे. तसेच शेती आणि मातीबद्दल त्यांना कमालीचा जिव्हाळा आहे. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला पूर्णवेळ उद्योगात गुंतवून घेतले आहे. अभिता कंपनीच्या यामाध्यमातून त्यांनी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले आहे. विविध क्षेत्रात अभिता कंपनीचे काम सुरु आहे. आता अभिता ई सुविधा केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. कंपनीच्या पहिल्या ई- सुविधा केंद्राचा खारघर येथे शुभारंभ झाला. याद्वारे नागरिकांना विविध डिजिटल, बँकिंग व शासकीय सेवा एकाच ठिकाणी, जलद, विश्वासार्ह आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ग्राहकांचा विश्वास आणि सहकार्य हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. याच विश्वासाच्या बळावर अधिक गुणवत्तापूर्ण, विश्वासार्ह आणि आधुनिक सेवा देण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.