घरासमोरून दुचाकी लंपास ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
* हिवरा आश्रम येथील घटना
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिवरा आश्रम येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याची घटना 28 जून रोजी घडली. या घटनेमुळे परिसरातील दुचाकी चालकामध्ये दहशत पसरली आहे. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिस शाह जुम्मा शाह यांच्या मालकीची MH 28 BZ 1972 क्रमांकाची मोटारसायकल त्यांच्या घरासमोर उभी होती. २८ जून २०२६ पहाटे सुमारे १:५५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लंपास केली. विशेष म्हणजे, चोरीची संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये चोरटे मोटारसायकल घेऊन पसार होताना स्पष्ट दिसत आहेत. या फुटेजच्या आधारे साखरखेर्डा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे हिवरा आश्रम परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आपल्या वाहनांची सुरक्षित ठिकाणी पार्किंग करावी, तसेच शक्य असल्यास वाहन लॉक, हँडल लॉक आणि इतर सुरक्षा उपायांचा वापर करावा, असे आवाहन साखरखेर्डा पोलिसांनी केले आहे.
