दुग्ध उत्पादनाला येणार सोन्याचे दिवस !* जिल्ह्यात अभिता पशु आहार विक्री दालनांचा शुभारंभ

दुग्ध उत्पादनाला येणार सोन्याचे दिवस !
* जिल्ह्यात अभिता पशु आहार विक्री दालनांचा शुभारंभ 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक सुनील शेळके यांच्या संकल्पनेतून विविध ठिकाणी अभिता पशु आहाराची दालने सुरु करण्यात आली आहेत. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनाला सोन्याचे दिवस येण्याचा प्रवास सुरु झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

        दुग्ध उत्पादनात पशु आहाराची महत्वाची भूमिका असते. जनावरांना चांगले खाद्य मिळाल्यास जास्त प्रमाणात दुग्ध उत्पादन होते. पश्चिम महाराष्ट्र दूध उत्पादनात अव्वल आहे. त्या भागातील शेतकरी पशूंना चांगला आहार देण्यावर भर देतात. या बाबीचा विचार करून अभिता ऍग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून पशु आहाराची दालने सुरू करण्यात आली आहेत. २८ एप्रिल रोजी साखरखेर्डा येथे उदघाटन करण्यात आले आहे. तर २ मे रोजी मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे अभिता पशु आहार विक्री केंद्राचे उदघाटन करण्यात आले. धामणगाव बढे येथील अधिकृत विक्रेते गणेश भागवत निर्मळे -9561546293, भरत पंढरी निर्मळे - 7391858618 असून यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील अधिकृत विक्रेते ओम बाळासाहेब पऱ्हाड - 9075704665
ईश्वर राजाराम पऱ्हाड - 8080418657 असून खरेदीबाबत त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आहवान करण्यात आले.