* शंभर नंबरी शाळा : रायपूरच्या जिजाऊ ज्ञान मंदिरचा निकाल शंभर टक्के
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड, बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट (रायपूर) शाळेचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागला आहे. बारावी पाठोपाठ शाळेने दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. या शंभर नंबरी शाळेने उत्कृष्ट निकालातून ग्रामीण भागाची मान उंचावली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भट, रायपूरचा शंभर टक्के निकाल लागला आहे. शाळेचे एकुण ३९ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्वंच विद्यार्थी चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाले आहे. तसेच टक्केवारीत विद्यार्थ्यांनी भरारी घेतली आहे. निकालात ९३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक राम समाधान गव्हाणे व ओम विलास शेळके यांनी मिळवला आहे. तर ९३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक धीरज अंकुश कुडके याने मिळवला तर तृतीय क्रमांक ९२ टक्के गुण मिळवत सई मनोहर सिरसाट हिने पटकावला. शाळेचे ९० टक्के पेक्षा ११ विद्यार्थी असुन ८० ते ९० टक्के दरम्यान २१ विद्यार्थी आहेत तर ७ विद्यार्थी ७० टक्केच्या वरती आहे. या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संस्थाध्यक्ष संदीप शेळके, प्राचार्य किशोर सिरसाट यांनी कौतुक केले.
निकालाबाबत बोलताना संस्थाध्यक्ष संदीप शेळके म्हणाले की, शाळेने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आपला हेतू साध्य होताना दिसतो आहे. त्याचबरोबर शाळेची शिस्त, प्रशासन, उपलब्ध सुविधा, डिजिटल माध्यमातून होणारे प्रशिक्षण व शिक्षण तसेच शाळेत होणारे अतिरिक्त नियमित शिकवणी वर्ग या सर्वांमुळे यावर्षी निकालाची टक्केवारी सुधारली आहे. यापुढेही आपण चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी केवळ टक्केवारीकडे न बघता गुणवत्तेच्यादृष्टीने प्रयत्न करावा.
