दहावीच्या परीक्षेत सहकार विद्या मंदिरचे सुयश * आदित्य खंडारे विद्यालयातून प्रथम

दहावीच्या परीक्षेत सहकार विद्या मंदिरचे सुयश 
* आदित्य खंडारे विद्यालयातून प्रथम 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंळाव्दारे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. सहकार विद्या मंदिरच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. 

            बुलढाणा येथे काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेले तहसीलदार तथा अकोला उपजिल्हाधिकारी रूपेश खंडारे यांचा मुलगा आदित्य खंडारे हा विद्यालयातून प्रथम आला आहे. आदित्य खंडारे याने 91%, अर्पण मुथा 91%, रिद्धी वसू 90%, शेख अरशिया 87%, अस्मिता उबरहंडे 86%, अथर्व खाचणे 85% गुण प्राप्त केले आहे. या यशाबद्दल आदित्य रुपेश खंडारे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तो आपल्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक शिक्षक, वडील रुपेश खंडारे, आई वैशाली खंडारे यांना देतो.