महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख उपक्रम 'छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर' चे आयोजन * देऊळगाव राजा नगरपरिषद येथे शिबिराचे उद्घाटन

महाराष्ट्र शासनाचा लोकाभिमुख उपक्रम 'छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर' चे आयोजन
 * देऊळगाव राजा नगरपरिषद येथे शिबिराचे उद्घाटन 
दे. राजा : (एशिया मंच न्यूज )
          सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज देवानंद कायंदे यांच्याहस्ते आज 8 मे रोजी दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा ज्योतिबा फुले , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाले . कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नगराध्यक्ष माधुरीताई शिंपणे यांनी भूषविले . सदर कार्यक्रमात विविध विभागाचे अधिकारी , कर्मचारी , नागरिक , नगरसेवक , पदाधिकारी, लाभार्थी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कार्यक्रमात संजय खडसे उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा, डॉ. योगेश अक्षय पशुसंवर्धन विभाग , विष्णू झोरे नगरसेवक , घनशीराम शिपणे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता यांनी मार्गदर्शन केले .
      सदर शिबिरात महसूल विभागाच्या वतीने व विविध विभागांचे मिळून एकूण ४९४ दाखले व प्रमाणपत्रांचे वाटप आमदार मनोज कायंदे व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले . कृषी विभागा तर्फे लाभार्थ्यांना ट्रॅक्टर , हार्वेस्टर ,रोटावेटर,या कृषी साहित्याचे वाटप सुद्धा आमदार व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    या कार्यक्रमाला तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, निवासी नायब तहसीलदार डॉ संतोष मुंडे , नायब तहसीलदार सायली जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी वायाळ ,कृषी अधिकारी कच्छवे , सहाय्यक दुय्यम निबंधक गुळवे, मुख्याधिकारी अरुण मोकळ ,नगर परिषदेचे पदाधिकारी व नगरसेवक,  पत्रकार बांधव व लाभार्थी आदींची उपस्थिती होती .
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय हिरवे मंडळ अधिकारी यांनी केले .सूत्रसंचालन रामदास मांटे मंडळ अधिकारी देऊळगाव राजा यांनी केले . तर आभार प्रदर्शन राजूभाऊ तागवाले ग्राम महसूल अधिकारी यांनी केले .