बुलढाणा अर्बन कंझूमर स्टोअर्समध्ये रत्नागिरी हापूस आंबा विक्रीला

बुलढाणा अर्बन कंझूमर स्टोअर्समध्ये रत्नागिरी हापूस आंबा विक्रीला 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       बुलढाणा जिल्हावासियाना  गेल्या 20 वर्षापासून बुलढाणा अर्बन कंझूमर स्टोअरचे अध्यक्ष राधेश्यामजी चंडक (भाईजी), बुलढाणा अर्बन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर तसेच बुलढाणा अर्बन चारिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा सौ.कोमलताई झवर यांच्या कल्पनेतून कोकणाचा राजा "हापूस आंबा" अविरत संस्थेच्या सभासद, ग्राहकांना बुलढाणा अर्बन कंझूमर स्टोअर्सच्या माध्यमातून योग्य दरात उपलब्ध करून देत आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी  2 मे 2026 रोजी बुलढाणा अर्बन कंझूमर स्टोअर्स मध्ये संस्थेच्या सभासद, ग्राहकांच्या मोठ्या मागणीनुसार कोकणचा राजा "हापूस आंबा" रत्नागिरीच्याच भावामध्ये विक्रीस उपलब्ध करून देण्यात आला आहे.
       सदर हापूस आंबा विक्री केंद्राचे शुभारंभ बुलढाणा अर्बन संस्थेचे उपाध्यक्ष विनोद केडिया, सरव्यवस्थापक, कैलास कासट, कंझूमर स्टोअरचे संचालक अरुण दिवटे यांच्याहस्ते व व्यवस्थापक  संजय कस्तुरे, संस्थेचे कर्मचारी नरेंद्र शर्मा, मोरेश्वर जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात करण्यात आले.
     हापूस आंबा स्टॉलच्या विक्री शुभारंभ मध्ये प्रथम ग्राहक म्हणून ॲड. विजय बोथरा यांना पहिली हापूस आंबा पेटी देऊन विक्री स्टॉलचे शुभारंभ करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी बुलढाणा शहरातील  रविभाऊ वानखेडे, डॉ.राठोड सर, बाहेकर सर, ॲड.अमर इंगळे, शैलेश कुराडे, सतीश उबाळे, पंकज सपकाळ, विकास उबाळे, सुशील वानखडे उपस्थित होते.