जळगाव जामोदात ४ मे रोजी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’* प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ करणार नेतृत्व ; सहभागी होण्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांचे आवाहन

जळगाव जामोदात ४ मे रोजी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’

* प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ करणार नेतृत्व ; सहभागी होण्याचे राहुलभाऊ बोंद्रे यांचे आवाहन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        अमेरिकन ट्रेड डीलमुळे स्थानिक उद्योग व शेतकऱ्यांवरील संकट, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी, शेतमालाला हमीभाव, वाढती महागाई आणि बेरोजगारी, गॅस-पेट्रोल- डिझेल दरवाढ व टंचाई, ईपस्टिन फाईल, खरात प्रकरण व झिरवाळ प्रकरणातील पारदर्शकतेचा अभाव, सामान्य जनतेलीत अन्याय आणि प्रशासनातील अपयश यांसारख्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्ष राज्यभर आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वात सोमवार ४ मे रोजी अन्नदाता संघर्ष पदयात्रेचे’ ’चे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा सकाळी ८ वाजता मानेगावातून सुरू होणार असून सायंकाळी ६ वाजता दुर्गा चौक, जळगाव जामोद येथे समारोप सभा होणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी दिली.

         गुरुवार ३० एप्रिल रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अन्नदाता संघर्ष पदयात्रेच्या नियोजना संर्दभात बैठक पार पडली. ‘शेतकऱ्याचा सन्मान…काँग्रेसचा अभिमान’ हे अन्नदाता संघर्ष पदयात्रेचे मुख्य सूत्र आहे. यात्रेत राज्यातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असून तालुका काँग्रेस कमिटी, जळगाव जामोद यांच्यावतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी या पदयात्रेत विक्रमी संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांनी केले. 

* या आहेत प्रमुख मागण्या : 

        अमेरिकन ट्रेड डीलमुळे आलेले स्थानिक उद्योग व शेतकऱ्यांवरील संकट दुर करा,  सरसकट कर्जमाफी करा, 7/12 कोरा करा,  शेतमालाला हमीभाव कायदा लागू करा,  सोयाबीनला ८०००, हरभऱ्याला ८०००, कापसाला १२००० तर तुरीला १०००० रुपये प्रति क्विंटल भाव द्या., पीक कर्जाला कोणतीही अट लागू करू नका, कृषी साहित्य जीएसटीमुक्त करा,  प्रति हंगाम प्रति एकरी ४० हजार रुपये पीक कर्ज द्या, शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारून बेरोजगारांना नोकरी द्या, स्थानिक पुरावे ग्राह्य धरुन आदिवासी बांधवांना जातीचे दाखले द्या, ढासळलेल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांवर शिक्षकांची रिक्त पदे भरा ह्या मागण्या आहेत.

         याप्रसंगी बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष राहुलभाऊ बोंद्रे, जेष्ठ नेते हाजी रशीदखा जमादार, डाॅ. स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील अवचार, मेहकर विधानसभा समन्वयक देवानंद पवार, संदीप दादा शेळके, मंगलाताई पाटील, जेष्ठ नेते अंबादास बाठे, अॅड विजय सावळे, चित्रांगण खंडारे, श्याम पठाडे, तुळशीराम नाईक, ईरफान पठाण, ईब्राहीम खान, सुनिल तायडे, दत्ता काकस, रामभाउ जाधव, रईसखा जमादार, अॅड अमर पाचपोर, अॅड भाउराव भालेराव, प्रमोद पाटील, निना इंगळे, अॅड जावेद कुरेशी, महेंद्र गवई, अमर कुळे, शिवराज पाटील, विठ्ठल चव्हाण, शैलेश खेडेकर, विजय कड, गजनफर खान, सुनिल पनपालीया, पृथ्वीराज राजपूत, शिवाजी क्षीरसागर, आदींसह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.