चिया हमीभाव खरेदी केंद सुरु करा : प्रयोगशील शेतकरी प्रेमकूमार राठोड यांची मागणी

चिया हमीभाव खरेदी केंद सुरु करा : 
प्रयोगशील शेतकरी प्रेमकूमार राठोड यांची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         कमी कालावधीत जास्त नफा देणाऱ्या चिया पिकाच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चिया हमीभाव खरेदी केंद सुरु करा, अशी मागणी प्रयोगशील शेतकरी प्रेमचंद राठोड यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्याकडे केली आहे.
         जिल्ह्यात 2476.3 हेक्टरवर चिया पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये मेहकर तालुका आघाडीवर असून 1405 हेक्टरवर चिया पेरणी करण्यात आली आहे. चिखलीत 662, लोणार 230, सिंदखेड राजा 140, खामगाव 24.5, संग्रामपूर 11, शेगाव 3.4 तर मोताळा तालुका लागवड क्षेत्र 0.4 एवढे आहे. जळगाव जामोद, बुलढाणा, देउळगाव राजा, मलकापूर व नांदुऱ्यात चियाकडे शेतकऱ्यांनी पाठ फ‍िरवल्याचे दिसून येत आहे. चिया पिकासाठी वाशिम व रिसोड हे लागवडीचे प्रमुख केंद्र बनत आहेत. मध्यप्रदेश हे चिया खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ आहे. उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ विक्री न करता ब्रँडिंग आणि योग्य मार्केटिंगवर भर दिल्यास अधिक नफा मिळू शकतो. बाजारात चिया बियांची विश्वासार्ह आणि खात्रीशीर मागणी असल्याने हे एक उत्तम व्यावसायिक पीक मानले जात आहे. त्यामुळे शेतकरी या पिकाला पसंती देत आहेत. वाशिम आणि रिसोड ही शहरे नजीक असल्याने मेहकरमध्ये चिया लागवडीचा कल वाढला आहे. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करीत असून ही चांगली बाब आहे. शासनाने त्यांना पाठबळ दिले पाहिजे. फळबागांना मिळते तेवढी नुकसान भ्ररपाई चियाला सुध्दा मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. चियाचा औषधी बनवण्यासाठी वापर होतो. प्रोत्साहन मिळाले तर शेतकरी अधिक जोमाने चियाकडे वळतील, असे गोतमारा येथील प्रयोगशील शेतकरी प्रेमकूमार राठोड यांनी सांगितले.