देऊळघाट मध्ये पाणीपुरवठा ठप्प !
* क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील लोकसंख्येने मोठे असलेले देऊळघाट गावात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक सुविधेअभावी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा येथील गटविकास अधिकारी यांना आज 22 एप्रिल रोजी निवेदन यांना देण्यात आले. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.
दिलेल्या निवदनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने प्रशासनाच्या उदासीन भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. तरीही उन्हाळ्यामध्ये दीड ते दोन महिन्यापासून पाणीपुरवठा बंद राहणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. जर लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करण्यात आली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल व रास्ता रोको करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी अमोल मोरे, अरबाज खान, पवन काकडे, शेख खालीद, शेख अतिक, आमीर खान, जाकीर खान, शेख तौफिक, शेख नसीम यांच्यासह देऊळघाटचे ग्रामस्थ उपस्थित होते.
