रोल्स रॉयल गाडीतून बाबासाहेब व माता रामाचा जिवंत देखावा ठरला आकर्षण

रोल्स रॉयल गाडीतून बाबासाहेब व माता रामाचा जिवंत देखावा ठरला आकर्षण  
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त १४ एप्रिल रोजी निघालेल्या सर्जनिक मिरवणुकी मध्ये इंदिरा नगर, यशवंत नगर, तानाजी नगर या वार्डातील चित्ररथ मिरवणुकीतील खास आकर्षण ठरले. या नगरातील युवकांनी "रोल्स रॉयल" या ब्रिटिश कालीन चारचाकी गाडीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची मिरवणूक काढल्याचा जिवंत देखावा साकारला होता. मिलिंद इंगळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर सौ.भीमा मिलिंद इंगळे यांनी माता रमाई यांची भूमिका साकारली होती. चित्र रथावर बाबासाहेब व माता रमाई यांचे हुबेहूब दर्शन होत असल्याचा प्रत्यय येत असल्याने अनेकांनी या नगरातील युवकांचे कौतुक केले. विशेष म्हणजे ही गाडी खास बाहेरगावाहून आणण्यात आली होती.जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सागर दिपक जाधव यांच्या नेतृत्वात ही मिरवणूक काढण्यात आली होती.