ईसोलीत संविधान उद्देशिका लेखनातून संविधान निर्मात्याला अभिवादन* भीम टायगर ग्रुपची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली

ईसोलीत संविधान उद्देशिका लेखनातून संविधान निर्मात्याला अभिवादन
* भीम टायगर ग्रुपची महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली 
ईसोली : (एशिया मंच न्यूज )
        भीम टायगर ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संविधान उद्देशीका लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामाध्यमातून संविधान निर्मात्याला अभिवादन करण्यात आले.

         दरवर्षीप्रमाणे सकाळी सर्व बौद्ध उपासक, उपासिका, गावकरी व समाजसेवक यांनी बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन केले. मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. समाजातील शाळकरी मुलांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्याची परंपरा जपण्यात आली.भीम टायगर ग्रुपने दाखून दिले की, जयंतीच्या उत्सहात सहभागी होऊन शिक्षणाची गोडी कशी जपता येते. इतरही उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी संपूर्ण गावातून उत्सहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गावातील सर्व समाजाचे लोक सहभागी झाले. जयंती उत्सवासाठी सहकार्य आणि परिश्रम घेणाऱ्यांचा सत्कार करून त्यांना संविधान पुस्तक भेट देण्यात आले. बुद्धवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.