गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज 20 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देत उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त रूग्णाची तसेच इतर रुग्णालयातील रुग्णानाही भेट घेवून रुग्णसेवेबद्दल विचारपूस केली.
 
           देवदर्शनाला जात असतांना मोताळा तालुक्यातील भविकांच्या गाडीला उत्तर प्रदेशातील गाजीपुर नंदगज येथे 9 एप्रील रोजी अपघात झाला होता. या अपघात दोन महीला ठार झाल्या तर 38 प्रवासी जखमी झाले होते, त्यांच्यावर गाजीपुर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली तर काहींनी बुलढाणा येथे उपचार करीता आणण्यात आले, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज 20 एप्रील रोजी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला अचानक भेट देऊन तेथील उपचार घेत असलेल्या गाजीपुर अपघातग्रस्त श्रीमती निर्मलाबाई पाखरे, भागीरथी चौधरी यांची भेट घेऊन त्यांची चौकशी केली. सोबतच मिळत असलेल्या वैद्यकीय सुविधेबद्दल माहिती जाणून घेतली. तदनंतर वार्ड क्रमांक 2 मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसोबतही चर्चा केली. यावेळी जिल्हाशल्य चिकित्सक दत्तात्रय बिराजदार, अतिरिक्त जिल्हाशल्य डॉ. भागवत भुसारी उपस्थित होते.
          त्यानंतर रोहीणखेड येथील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सरस्वताबाई पाखरे यांच्या निवासस्थांनी सांत्वनपर भेट दिली. याच गावतील जखमी भानुदास हुंबड, नलीनी हुंबंडच्या घरी भेट देऊन तब्बेतेची चौकशी केली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे चिरंजीवी पृथ्वीराज गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील,   तालुका प्रमुख रामदास चौथनकर, गणेशसिंग राजपूत,  निलेश राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.