शेतकऱ्यांचा माल खरेदी होईपर्यंत नाफेड केंद्रे सुरू ठेवावीत - जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत
* जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नाफेड अंतर्गत शेतमाल खरेदी केंद्र बंद करण्यात व आलेले आहेत. मका, सोयाबीन तसेच इतर शेतमाल सीसीआयची कापूस खरेदी केंद्र देखील बंद पडत असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या घरातील शेती उत्पादनाचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत ही खरेदी केंद्र सुरू ठेवण्यात यावीत, अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शुक्रवार ६ मार्च रोजी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, जिल्ह्यात २०२५-२६ च्या खरीप हंगामात एकूण ५२,८५५.७ हेक्टर क्षेत्रावर मका लागवड करण्यात आली आहे. नाफेडच्या निकषानुसार हेक्टरी ३९ क्विंटल उत्पादन गृहीत धरल्यास जिल्ह्यात अंदाजे २०, ६१,३७२.३ विवंटल मका उत्पादन अपेक्षित असतांना देखील जिल्ह्यासाठी प्रत्यक्षात केवळ ६० हजार क्विंटल इतकेच खरेदी उद्दीष्ट देण्यात आले आहे. जे एकूण उत्पादनाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार ७०० शेतकऱ्यांनी नाफेडकडे मका खरेदीसाठी नोंदणी केलेली असतानाही मका खरेदीचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याने अनेक नाफेड खरेदी केंद्रांवर मका खरेदी बंद ठेवण्यात आलेली आहे. सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर अनिश्चित आहेत. हमी केंद्रांवरील दर निश्चित आहेत. शेतकऱ्यांनी सीसीआयला प्राधान्य दिले होते. गेल्या ४ महिन्यांपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होती. मात्र आता खरेदी बंद पडत असल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांवर अवलंबून राहावे लागेल. यामुळे आर्थिक शोषणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या घरातील कापूस खरेदी होईपर्यंत सीसीआय केंद्र सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, राज्यप्रवक्ता अॅड. जयश्रीताई शेळके, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने यांच्यासह डी. एस. लहाने, अॅड. सुमित सरदार, आशिष रहाटे, किशोर गारोळे, लखन गाडेकर, गजानन ठोसर, दादाराव खार्डे, श्रीकिसन धोंडगे, विजय इतवारे, विजय इंगळे, निंबाजी पांडव, राजू बुधवत, दिपक चांभारे, शुभम पाटील, मोहित राजपूत, सिद्धेश्वर आंधळे, प्रतीक्षाताई पिंपळे, अनिता गायकवाड, अर्चना शेळके, अर्चना गायकवाड, रत्ना शेळके, पल्लवी शेळके, स्मिता वराडे, सविता बैरागी, नीता चव्हाण, सुवर्णा जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
