सरकारची कर्जमाफी फसवी- जयश्रीताई शेळके * राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली प्रतिक्रिया

सरकारची कर्जमाफी फसवी- जयश्रीताई शेळके 
* राज्याच्या अर्थसंकल्पावर व्यक्त केली प्रतिक्रिया 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी दिली. 

       राज्य शासनाचा अर्थसंकल्प शुक्रवार ६ मार्च रोजी विधीमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर जयश्रीताई शेळके यांनी आपले मत व्यक्त केले. "आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांवर दोन लाखांहून अधिक कर्ज आहे. एकीकडे शासनाने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते; मात्र केवळ २ लाखांपर्यंत आणि ती सुद्धा अटी-शर्ती घालून केलेली कर्जमाफी फसवी आहे." असे त्यांनी नमूद केले.