* नागरिकांनी सहभागी होण्याचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन
शेगाव : (एशिया मंच न्यूज )
संतनगरी शेगाव येथे आयुष मंत्रालयाच्या वतीने चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य घेण्यात आला आहे या राष्ट्रीय महामेळाव्याचा समारोप नेत्र तपासणी चष्मे वाटप शिवीराने होणार आहे या शिबिरामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केंद्रीय आयुष , आरोग्य व कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे
शेगाव येथे आयोजित आरोग्य शिबीरात २८ फेब्रुवारी रोजी विशेष नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई व इतर ठिकाणांहून नामांकित नेत्रतज्ज्ञांच्या उपस्थितीत हा उपक्रम पार पडणार असून गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा भव्य महामेळावा दि. २५ फेब्रुवारीपासून श्री गजानन महाराज संस्थान यांच्या विसावा भक्तनिवास संकल्प परिसरात सुरू आहे. केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. २८ फेब्रुवारी रोजी आयोजित नेत्र तपासणी शिबिरात अनुभवी नेत्ररोग तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी केली जाईल. गरजेनुसार मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात येणार आहे. विशेषतः जेष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुब राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे आरोग्य हीच खरी संपत्ती असून आयुष पद्धतीद्वारे सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हा केंद्र सरकारचा संकल्प आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महामेळाव्याला शेगाव शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत व मार्गदर्शन सत्रांमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गरजू रुग्णांनी २८ फेब्रुवारी रोजी वेळेत उपस्थित राहून नेत्र तपासणी व चष्मे वितरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
