* अमोल रिंढे पाटील यांचा प्रशासनाला इशारा!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
चिखला काकड गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून झालेल्या वादात महिलांची छेडछाड व गंभीर मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत मनसेचे नेते अमोल रिंढे पाटील यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांची गय केल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
जिजाऊंच्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात महिलांची छेड काढली जाते, महिलांना मारहाण होते व छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वेष केला जातो, हे कदापी खपवून घेतल्या जाणार नाही. माया बहिणींची छेडछाड, मारहाण, शिवीगाळ करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करा, अन्यथा मनसे आंदोलन उभे करेल. २० फेब्रुवारी रोजी चिखला गावी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद झाला. संजीवनी वाघ सह पुतळ्याचे संरक्षण करणाऱ्या महिलांना सरपंच व त्यांच्या साथीदारांनी छेडछाड करीत कपडे काढून बेदम मारहाण केली, असा आरोप आहे. तसेच महाराजांच्या पुतळ्याची देखील विटंबना केल्याचा आरोप, संजीवनी वाघ यांनी केला आहे. त्यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ प्रसारित झालेत. ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली आहे. घटनेचे गांभीर्य पाहता मनसेचे नेते अमोल पाटील यांनी या प्रकरणाचा निषेध करीत पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्रात छत्रपतीचा पुतळा फेकून देण्याची भाषा करता, महिलांची छेड काढली जाते, त्यांची कपडे काढली जाते, क्रूर मारहाण करण्यात आली. महाराजांबद्दलचा द्वेष व तुमच्या कुरपणाचा माज संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. महाराष्ट्राची मान खाली घालायला लावेल, अशी ही घटना आहे असे रिंढे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, आहे.
