संत निरंकारीचे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान* मेहकरात पैनगंगा नदीची स्वच्छता

संत निरंकारीचे स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
* मेहकरात पैनगंगा नदीची स्वच्छता 
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
       संत निरंकारी मिशनची सेवा भावना आणि मानव कल्याणाचा संकल्प साकार करण्याच्या हेतुने ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ आज रविवार 22 फेब्रुवारी 2026 रोजी परम श्रद्धेय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात यमुना नदीच्या छठ घाट, दिल्ली येथून देशभरात राबविण्यात आला असून, मेहकर येथील पैनगंगा नदी व काठ स्वच्छ करण्यात आला.
       संत निरंकारी मिशनने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या प्रेरणादायक शिकवणूकींना आत्मसात करत वर्ष 2023 मध्ये संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने ‘प्रोजेक्ट अमृत’चा शुभारंभ केला गेला. या दिव्य पुढाकाराचा उद्देश केवळ जलस्रोतांची स्वच्छता सुनिश्चित करणे इतकाच नसून, जल संरक्षणाला मानवी जीवनाचे अभिन्न अंग बनविण्याचा विचार विकसित करणे हा आहे. नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी आणि झरे यांसारख्या प्राकृतिक जलस्रोतांची स्वच्छता व संरक्षणाला समर्पित या महाअभियानाच्या पहिल्या दोन टप्प्यांना अभूतपूर्व यश मिळाले. याच प्रेरणेतून यावर्षी तृतीय टप्पा अधिक व्यापक, प्रभावी व दूरगामी दृष्टीकोनातून राबविण्यात आला.
हे बृहत अभियान देशभरातील 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 900 पेक्षा अधिक शहरांमध्ये 1600 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी आयोजित करण्यात आले होते. संत निरंकारी मिशनचे सुमारे 10 लाख समर्पित स्वयंसेवक आणि त्याबरोबरच इंद्रप्रस्थ, जे.एन.यू. व दिल्ली विद्यापीठासह विविध संस्थांच्या युवकांसमवेत जल संरक्षण आणि स्वच्छतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवला गेला. 
          मेहकर युनिटच्या वतीने पैनगंगा नदीच्या तीरी हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये मुखी सत्यनारायण सौभागे, सेवादल संचालक प्रकाश अवताडे, शिक्षक संजय माने, संतोष उबाळे, प्रमोद देशमुख, विष्णू माने, युवराज सरसंडे, शुभम अंभोरे, मदन बोरुडे, गजानन बोदडे, निलेश अंभोरे, विनोद शिरलोढे, ज्ञानेश्वर माने, संतोष कुंभार, हरिदास कुंभार, अथर्व धोंडगे, नकुल सहदेव, गुळाचकर, आयुष अवताडे, जयश्री डव्हळे, कविता पाटील, सीमा गायकवाड, भक्ती गायकवाड, निकिता अंभोरे, वैशाली अवताडे, पारुबाई माने, छाया सोनुने, विजया शिरलोढे, अंजली भंसाली, कुसुबेताई, अंजली धोंडगे, श्रद्धा धोंडगे, मायाताई खंडारे यांचेसह असंख्य सेवेकरी तथा नगर परिषदेचे अख्तर साहेब व कर्मचारी यांचे योगदान लाभले.