शहरातील मोकाट श्वानांचा न.प.प्रशासना कडून बंदोबस्त

शहरातील मोकाट श्वानांचा न.प.प्रशासना कडून बंदोबस्त 
दे. राजा :   (एशिया मंच न्यूज )
         शहरातील बहुतांश भागात मोकाट श्वानाणी थैमान माजवले होते तर काही भागात या मोकाट श्वानाणी पाद चाऱ्यांच्या मागे लागून त्यांना चावा घेण्याचे प्रकार ही वाढले होते. या प्रकरणी नागरिकांनी न. प .प्रशासनाचे मुख्याधिकारी अरुण मोकळ यांना निवेदन देऊन त्या मोकाट श्वाननांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली वरून तात्काळ विशेष पथकाद्वारे शहरातील सर्वच भागात फिरत असलेले मोकाट श्वान पकडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान दिसून आले. कार्य तत्पर म्हणून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केलेल्या अरुण मोकळ यांनी जनतेला न.प.ची जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्यात येऊन जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. आरोग्य विभागाचे प्रमुख जतीन नकवाल,  दरोगा संजय चितेकर व त्यांचे पथक हे नेहमी शहरात गस्तीवर असून मोकाट श्वानासोबतच स्वच्छतेकडे लक्ष देऊन आहेत.