आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनिल नाटेकर यांचा गौरव

आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये अनिल नाटेकर यांचा गौरव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       येळगाव येथील कवी, गझलकार, गीतकार, सुत्रसंचालक असे बहुआयामी व्यक्तिमत्व कलाशिक्षक अनिल नाटेकर येळगावकर यांचा पुणे येथील आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय फुले प्रेमी समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

         मूळचे येळगाव येथील अनिल नाटेकर आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रं.४ आळंदी देवाची, पुणे येथे कार्यरत आहेत. फुले, शाहू, आंबेडकर विचारधारा घेऊन त्यांचा जीवन प्रवास सुरू आहे. त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय असतात.                         कविसंमेलनात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. संविधान जागर कविसंमेलन व संविधान प्रचार कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला. यानिमित्त जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होत आहे.