* शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळकेंची बोलकी फेसबुक पोस्ट चर्चेत...
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिवसेना उबाठा राज्य प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांची बोलकी फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. शेतात कोथिंबीर निवडतांनाचा फोटो त्यांनी सोबत पोस्ट केला आहे. शेतकऱ्याच्या आयुष्यातील संघर्ष मांडणारी ही पोस्ट असली तरी यामाध्यमातून सध्या राज्याच्या राजकारणात सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले आहे. "नव्या जोमाने उगवून येणारी पीकं आणि माणसं सगळ्यानाच हवीशी वाटतात.." या मोजक्या ओळी जयश्रीताईंच्या शब्द सामर्थ्याचा परिचय देणाऱ्या आहेत.
एशिया मंचच्या वाचकांसाठी जयश्रीताई शेळके यांची ही खास फेसबुक पोस्ट देत आहोत...."माझा बळीराजा कितीही संकट आलं तरी त्याला हिमतीने तोंड देतो. काळ्या आईवर विश्वास ठेवून तो पेरणी करत असतो. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, कोणत्याही कारणाने पेरलेलं उलटलं, नाहीच उगवलं तरीही हार मानत नाही, पुन्हा पेरणी करतो. एका दाण्याचे हजार दाणे करण्याची ताकद ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आपण; आयुष्याने परीक्षा घ्यायची ठरवली तर त्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल…! आपणही तेच करायचं कितीही उलटली तरी पुन्हा-पुन्हा पेरणी करायची ! नव्या जोमाने उगवून येणारी पीकं आणि माणसं सगळ्यानाच हवीशी वाटतात".....
जयश्रीताई शेळके हे चळवळीतून पुढे आलेलं नेतृत्व आहे. संघर्ष त्यांना नवा नाही. आजपर्यंतच्या सामाजिक, राजकीय जीवनात अनेक चढउतार पाहिले आहेत. आपण काल काय केले? यापेक्षा आता काय करतोय? आणि उद्या काय करणार? या गोष्टीला जास्त महत्व देणाऱ्यांपैकी त्या आहेत. झालं गेलं विसरुन नव्याने कामाला लागायचा त्यांचा स्वभाव. विधानसभा निवडणुकीचा निसटता पराभव विसरुन लगेचच सामाजिक जीवनात सक्रिय झालेल्या जयश्रीताई जिल्ह्याने पहिल्या आहेत...
