जिजाऊ जन्मोत्सव नियोजन : मातृतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक* मराठा सेवा संघाकडून जय्यत नियोजनाला सुरुवातजन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे : विजयकुमार घोगरे

जिजाऊ जन्मोत्सव नियोजन : मातृतीर्थावर महत्त्वपूर्ण बैठक
* मराठा सेवा संघाकडून जय्यत नियोजनाला सुरुवात
जन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे : विजयकुमार घोगरे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         12 जानेवारी 2026 ला सालाबादप्रमाणे लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे होऊ घातलेल्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंच्या भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी मराठा सेवा संघा कडून सुरू आहे. त्या संदर्भात केंद्रीय कार्यकारिणीची बैठक सिंदखेडराजा राजा, जिजाऊ सृष्टीवर मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यंदा जन्मोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे , त्यासाठी सर्वांनी परिश्रम घ्यावे असे प्रतिपादन विजयकुमार घोगरे यांनी यावेळी केले.

            याप्रसंगी जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहेकरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.शिवाजीराव तनपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ सृष्टी सहसचिव सौरभ खेडेकर, प्रकल्प संचालक अरविंद गावंडे, जिल्हाध्यक्ष रवींद्र चेके, मुख्य समन्वयक डॉ. मनोहर तुपकर, डॉ कळकुंबे पाटील, विलासराव तेजनकर, तुपकर मामा, रामेश्वर ढगे पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अँड उर्मिला हाडे, वारकरी परिषदेच्या ज्योती ताई जाधव, संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक योगेश पाटील,सुदर्शन तारक, जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील, अमर पाटील, संजय धोरण, संजय विखे, विवेक काळे, प्रा.गव्हाड , आरमाळ सर, सागर खान्देभराड, रंजना देशमुख,  ज्योती खांडेभराड, सविता खांडेभराड,आकांक्षा
देशमुख, लता साबळे, नंदा आरमाळ, प्रिया हराळे, शारदा बावणे, दिपाली पडोळे, अकोला येथील पटोकार, प्रा.दिलीप नाईकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

* प्रशासनाशी समन्वय : 
          बैठकीत जिजाऊ जन्मोत्सवाच्या आयोजनातील महत्त्वाचा प्रश्नावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, स्थानिक पोलीस स्टेशन, नगरपालिका यांच्याशी समन्वय साधून जिजाऊ जन्मस्थळ ते जिजाऊ सृष्टी इथपर्यंतच्या अंतरामध्ये, एस.टी. महामंडळातर्फे अल्प दरात तिकीट लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बस सेवा सुरू ठेवण्यात यावी, त्यामुळे लहान मुले, महिला, पुरुष, तसेच इतरही जिजाऊ भक्तांना सर्व कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. जिजाऊ सृष्टी ते जिजाऊ जन्मस्थळ या ठिकाणच्या सर्व पार्किंग व्यवस्थेत सुसूत्रता,समन्वय असावा तसेच, वाहनांना न अडवता व वाहतूक व्यवस्था सुरक्षितपणे चालवून जालना रोड वरील पार्किंग पर्यंत जिजाऊ भक्तांना सहज येता आली पाहिजे. तसेच एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध होत नसल्यास स्थानिक शाळांच्या बसव्यवस्था विषयी सहकार्य घेण्यात यावे, याविषयी सर्वांचे एकमत झाले. उपस्थित नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौरभ तायडेनीं यांनी सुद्धा याबाबत सहकार्य करण्याचे सत्कार प्रसंगी सांगितले. बैठकीत सर्व सुविधांसाठी येणारा खर्च, जमा होणार निधीचे नियोजन व पारदर्शकता यावरही चर्चा झाली. जिजाऊ जन्मोत्सव प्रचार आणि प्रसार आणि समाज माध्यम यांचा व्यवस्थित उपयोग करून आयोजना पासून ते जन्मोत्सवापर्यंत माहिती महाराष्ट्रभर प्रसारित करण्यात यावी असे ठरले.

* यांच्यावर राहणार समित्यांची जबदारी
          प्रसंगी विविध समित्यांची जबाबदारी देण्यात आली असून बुक स्टॉल बुकिंग वाटप सुमित खांदवे, प्रा.अशोक निकस,
शाहीर व पोवाडे समिती शाहीर गुलाबराव नळणीकर, शाहीर सतीश कुरंगळ, नवोदित वक्ते व सांस्कृतिक समिती रवींद्र चेके, विनायक दंदाले, मदन बोडखे, सामूहिक विवाह समिती विलास तेजनकर, अशोक मामा तुपकर, गजानन चेके, साहित्यप्रकार समिती डॉ. बालाजी जाधव,प्रा. गजानन जारे, प्रा.दीपक पाचरणे, प्रमुख अतिथी निमंत्रण समितीमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पाहुणे यांना आमंत्रित करणे, ही जबाबदारी प्रशांत तेलगड, प्रा.योगेश्वर निकस, सिंदखेडराजा महिला निवास समिती अँड उर्मिलाताई हाडे, लताताई शिंदे, रंजनाताई देशमुख, सविताताई खांडेभराड, पुरुष निवास समिती डॉ. खांदवे, डॉ. कळकुंबे, रामेश्वर कुहिरे, एकनाथ मस्के, बाहेर जाऊन येणाऱ्यांची निवास व्यवस्था वृंदावन लॉन विलास तेजनकर, अतुल शिंदे, जगदीश एखंडे, संदीप सास्ते, संदीप कानोडजे, दुसरबीड येथे प्रा.सुधीर निकम, अशोक सावडेसर, जालना निवास व्यवस्था बाबासाहेब कडोस, बबन गाडेकर, देऊळगाव राजा एकनाथ जाधव, वसंत शिंदे, दीपोत्सव मशाल व यात्रा उर्मिला ताई हाडे, ज्योतीताई जाधव, शारदा बावने, प्रा.प्रियाताई हराळे, राहुल कुहिरे, श्रीहरी कुहिरे,  11 जानेवारी सांस्कृतिक कार्यक्रम समिती जिजाऊ ब्रिगेड राज्य कार्यकारिणी सीमाताई बोके, 12 जानेवारी वारकरी दिंडी सोहळा शिवमती ज्योतीताई जाधव, पंडितराव देशमुख, व्हीआयपी निवास व्यवस्था समिती अण्णासाहेब आरमाळ, रामेश्वर ढगे, लक्ष्मण लोंढे, दिलीप मानवतकर, अँड निशिकांत राजे, सावित्री जिजाऊ दशरात्रोत्सव समिती उर्मिलाताई हाडे, नंदाताई आरमाळ, प्रा.गव्हाड, सुखदेव बुरकुल, सागर खांडेभराड, संत चोखामेळा जयंती समिती, सुखदेव बुरकुल, संजय राजे, संतोष बुरकुल, प्रचार प्रसारक रथ सिंदखेडराजा प्रा.मधुकर गव्हाड, जळगाव राजा अमोल दंदाले, सुरक्षा समिती योगेश पाटील, गजानन भोयर, पांडुरंग पाटील, अमर पाटील , विचार मंच संयोजन समिती प्रा.मधुकर गव्हाड, धनंजय पाटील, रवींद्र चेके, योगेश पाटील, अँड राजेंद्र ठोसरे, विचारमंच सजावट समिती माधव शिरफुले, संजय विखे, कैलास तायडे, प्रचार प्रसार, समाज माध्यम समिती प्रा.दिलीप नाईकवाड, विनीत वानखेडे, अभय पाटील, विवेक काळे, रणजीत थिपे, हर्षवर्धन कदम यांच्याकडे आहे. अशाप्रकारे विविध समित्यांची जबाबदारी देण्यात आली असून जिजाऊ माँ साहेबांचा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी केंद्रीय समितीने महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले.