अनिकेत पवार सी. ए. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण * ना.प्रतापराव जाधव यांनी केला सत्कार

अनिकेत पवार सी. ए. परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 
* ना.प्रतापराव जाधव यांनी केला सत्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      अत्यंत गरीब परिस्थितीतून क्षण घेत येथील अनिकेत राजेश पवार याने सी. ए .ची परीक्षा प्रथम श्रेणी पास करून आपल्या यशाची चुणूक दाखविली. त्याच्या या यशाबद्दल केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव व शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अनिकेतचा सत्कार केला. अनिकेत राजेश पवार पुणे येथे उच्च शिक्षण घेत असून कौटुंबिक परिस्थितीचे भान ठेवत त्याने हे यश संपादन केले. वडील राजेश पवार यांनी अत्यंत काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण दिले. चहाचे हॉटेल चालवून वेळप्रसंगी खारी ब्रेड विकून व खाणावळ चालवून आपला कौटुंबिक प्रपंच चालविला, मात्र मुलांच्या शिक्षणात त्यांनी काहीही कमतरता पडू दिले नाही. वडिलांच्या या कष्टाची जाण ठेवून मुलगा अनिकेत याने आपले लक्ष्य अभ्यासात केंद्रित करून अशा गरीब परिस्थितीतही शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या कष्टाचे चीज केले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय तो आई -वडील यांना देतो.
       केंद्रीय मंत्री नामदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड यांनी त्याचा कुटुंबासह सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.