* केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांना यश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
शिक्षक भरती परीक्षा( TAIT 2025 ) चा अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेले नाव, मोबाईल नंबर, ई -मेल किंवा अन्य कारणांनी काही चूक झालेली असल्यास TAIT परीक्षा देऊन नोंदणीसाठी पात्र ठरूनही नोंदणी करता येत नव्हती, केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडे पाठपुरावा केला, त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून आता पात्र उमेदवारांना दुरुस्ती करता येणार आहे, त्यामुळे राज्यातील हजारो उमेदवारांना फायदा होणार आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे दोन मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे. सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याचे अनेक उमेदवारांनी या संदर्भात केंद्रीय आयुष आरोग्य व कडून राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन या संदर्भाची विनंती केली होती. त्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे शिक्षण आयुक्त बेडसे त्यांच्याशी संपर्क साधून उमेदवारांच्या अडचणी त्यांना सांगितले होते. यामध्ये योग्य तो मार्ग काढण्यासंदर्भात सुचित केले असता, या संदर्भात एक परिपत्रक शिक्षण परिषदेच्या वतीने निर्गमित करण्यात आले आहे, ज्या उमेदवारांचा परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी TAIT-२०२५ साठी नोंद केलेल्या ई-मेल आयडी वरून त्यांनी विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पैनकार्ड, वाहन बालविण्याचा परवाना यापैकी एक कागदपत्र तसेच परीक्षा क्रमांक व TAIT-२०२५ परीक्षेचा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल क्रमांक यासह edupavitra२५@gmail.com या ई-मेल वर Update/Chagne Mobile number अशा विषय ई-मेल केल्यास अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येणार आहे.
* काही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करावा
TAIT 2025 परीक्षेचा निकाल लागून सर्वाना स्वप्रमाणपत्र भरण्यासाठीच्या प्रकियेची सर्व उमेदवार वाट पाहून असताना स्वप्रमाणपत्र भरण्यासाठीचा कालावधी 15 डिसेंबर 2025 ते 29 डिसे. 2025 दिलेला आहे . ही नोंदणी करताना उमेदवारांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागले त्यामध्ये, TAIT 2025 चा फॉर्म भरताना जी माहिती भरलेली होती, तीच माहिती घेऊन स्वप्रमाणपत्र म्हणजेच portal registration करण्याची सोय करतांना महिला उमेदवारांच्या विवाह आधी किंवा नंतर चे नावात बदल याबाबतच्या अडचणी साठी शिक्षणाधिकारी यांच्या loginn tab उपलब्ध करून देण्यात आली होती, परंतु उमेदवाराने दिलेल्या मोबाईल नंबर शिवाय portal site सुरु होत नसल्याने, ज्या परीक्षार्थीचा मोबाईल नंबर चुकला, हरवलेला किंवा जुन्या मोबाईल नंबर मध्ये बदल झालेला असल्याने त्यांना रेजिस्ट्रेशन करता येत नव्हते, त्यासाठीची कोणतीही उपाययोजना किंवा बदल करण्यासाठीची सोय पोर्टल वर नसल्याने चांगले गुण मिळवूनही या विद्यार्थ्यांना आपल्या यशापासून वंचित राहावे लागले असते, अशी उपाययोजना करण्याचे कोणतेही निकष यामध्ये उपलब्ध नसल्याने विध्यार्थी हतबल झाले होते. परंतु आता दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने सर्व पात्र TAIT धारकांनी नोंदणी करून घ्यावी, यात काही अडचण असल्यास शिक्षणाधिकारी यांचेकडे संपर्क साधावा, असे
आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
