खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेनाद्वारे मागणी

खोटे गुन्हे रद्द करण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेनाद्वारे मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पंचायत समितीमध्ये सिंचन विहिरीचे व गाय गोठ्याचे अनुदान का दिले नाही असा जाब विचारला असता सेनगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी शेतकरी नेते गजानन कावरखे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल  केले आहे. सदर गुन्हे हे खोटे असे सांगत  क्रांतिकारी शेतकरी संघटना बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने  जिल्हाधिकारी  यांना निवेदन देत खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी आज 3 डिसेंबर रोजी करणात आली आहे.

          दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे २६ नोव्हेंबर रोजी गजानन कावरखे, विजय वानखेडे व प्रवीण मते हे तालुक्यातील शेतकरी बांधव व घरकुल लाभार्थ्यांसोबत कामानिमित्त सेनगाव पंचायत समिती कार्यालयामध्ये गेले असता कार्यालयातील कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळले. संविधान दिन व २६/११ च्या हल्ल्यातील  शहिदांना श्रद्धांजली पर कार्यक्रम दुपारी १ वाजेपर्यंत न झाल्याची बाबही तिथे निदर्शनास आली. हि संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याना  फोनद्वारे देण्यात आली असून पत्रकार बांधवांनी त्या वेळचे व्हिडीओ चित्रीकरण केलेले आहे. सर्व विभाग रिकामे असल्याचे पत्रकारांनी फेसबुक चित्रीकरण करून दाखवले. मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी चुकीची व तथ्यहीन फिर्याद दाखल करत सेनगाव पोलीस स्टेशन मध्ये शासकीय कामात अडथळा व विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल केले आहे. असे दाखल केलेले खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे. व गटविकास अधिकारी यांची संपुर्ण चौकशी करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

         दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर बुलढाणा जिल्ह्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अमोल मोरे, महेंद्र जाधव, गजानन बापू देशमुख, सुरेश पवार, आमीन खांसाब, सतीश सुरडकर, नितीन सोनटक्के, पवन काकडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.